नेमबाज महेश्वरी ऑलिम्पिकसाठी पात्र

२७ वर्षीय महेश्वरीने ऑलिम्पिक पात्रता शॉटगन स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले. चीलीच्या फ्रॅन्सिकाने तिच्यावर शूट-ऑफमध्ये ४-३ अशी मात केली.
नेमबाज महेश्वरी ऑलिम्पिकसाठी पात्र

दोहा : नेमबाज महेश्वरी चौहानने महिलांच्या स्कीट प्रकारात पॅरिस ऑलिम्पिक २०२४ची पात्रता मिळवली. भारतासाठी ऑलिम्पिकचे तिकीट मिळवणारी ती २१वी नेमबाज ठरली.

२७ वर्षीय महेश्वरीने ऑलिम्पिक पात्रता शॉटगन स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले. चीलीच्या फ्रॅन्सिकाने तिच्यावर शूट-ऑफमध्ये ४-३ अशी मात केली. दोघींमध्ये प्रथमच ५४-५४ अशी बरोबरी होती. दोहा येथे सुरू असलेली ही स्पर्धा पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रतेच्या दृष्टीने अखेरची स्पर्धा आहे. २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला प्रारंभ होणार असून यावेळी भारतीय नेमबाजांकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे.

“गेल्या असंख्य वर्षांच्या मेहनतीचे हे फळ आहे. मला अद्यापही विश्वास बसत नाही, की मी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे,” असे महेश्वरी म्हणाली. आतापर्यंत ट्रॅप प्रकारात भौनीश मेंदिरट्टा, राजेश्वरी कुमारी, स्कीटमध्ये राईझा ढिल्लोन व अनंतजीत नारुकाने ऑलिम्पिक पात्रता मिळवली आहे.

logo
marathi.freepressjournal.in