भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून शोपमन पायउतार

भारतीय महिला संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरल्यावर प्रो हॉकी लीगमध्येही त्यांनी सुमार कामगिरी केली.
भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून शोपमन पायउतार

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून जॅनेक शोपमन यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला. नेदरलँड्सच्या ४६ वर्षीय शोपमन यांनी २०२१मध्ये ऑलिम्पिकनंतर संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. मात्र भारतीय महिला संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरल्यावर प्रो हॉकी लीगमध्येही त्यांनी सुमार कामगिरी केली. त्यामुळे शोपमन यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. शोपमन यांनी शोर्ड मरिन यांच्या मार्गदर्शनाखाली २०२१च्या ऑलिम्पिकमध्ये सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in