मढवी स्पोर्ट्स असोसिएशनच्या विजयात श्रावणीची चमक
PM

मढवी स्पोर्ट्स असोसिएशनच्या विजयात श्रावणीची चमक

प्रथम फलंदाजी करताना मढवी असोसिएशनने २० षटकांत ७ बाद १४४ धावा केल्या

ठाणे : यजमान डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन संघाने अर्जुन मढवी स्मृती महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत दहिसर स्पोर्ट्स क्लबचा ५४ धावांनी पराभव केला. श्रावणी पाटीलच्या अष्टपैलू खेळामुळे मढवी असोसिएशनचा विजय सोपा झाला. प्रथम फलंदाजी करताना मढवी असोसिएशनने २० षटकांत ७ बाद १४४ धावा केल्या. श्रावणीने नाबाद ३८, तर प्राजंल मळेकरने २५ धावांचे योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना दहिसर क्लबला २० षटकांत ८ बाद ९८ धावांपर्यंतच मजल मारता आली. कविता सिंगने त्यांच्याकडून ३५ धावांची झुंज दिली. श्रावणीने दोन, तर मेगन रॉड्रिग्जने तीन बळी मिळवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in