श्रेयस अय्यरकडे पंजाबचे कर्णधारपद; आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करणारा पहिला भारतीय

आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी पंजाब किंग्सने स्टार फलंदाज श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची धुरा सोपवल्यामुळे ऐतिहासिक कामगिरी त्याच्या नावे झाली आहे.
श्रेयस अय्यरकडे पंजाबचे कर्णधारपद; आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करणारा पहिला भारतीय
Published on

नवी दिल्ली : आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी पंजाब किंग्सने स्टार फलंदाज श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची धुरा सोपवल्यामुळे ऐतिहासिक कामगिरी त्याच्या नावे झाली आहे. आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

आयपीएल २०२४ मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सचे विजेतेपद पटकावले. दरम्यान, आगामी हंगामासाठी त्याला पंजाब किंग्सने २६.७५ करोडला करारबद्ध केले आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या लिलावात तो दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

कोलकाताकडून खेळण्याआधी अय्यरने दिल्ली संघाचेही कर्णधारपद भूषविले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने २०२० मध्ये स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. तो एकमेव कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळ्या संघांनी अंतिम फेरी गाठली आहे.

आयपीएलच्या इतिहासात अय्यरच्या आधी केवळी ३ खेळाडूंनी वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व केले आहे. श्रीलंकेचा महिला जयावर्धने किंग्स इलेव्हन पंजाबकडून त्याच्या आयपीएलधील कर्णधारपदाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने कोची टस्कर्स केरला आणि दिल्ली कॅपिटल संघाचे नेतृत्व केले.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्हन स्मिथनेही आयपीएलमध्ये तीन संघांचे कर्णधारपद भूषविले आहे. पुणे वॉरियर्स इंडिया, रायझिंग पुणे सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या संघाचे नेतृत्व केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in