कर्णधार रोहित शर्माचा विश्वास गमावल्याने श्रेयस बाहेर

संघातील विराट कोहलीच्या स्थानासाठी श्रेयस एका क्षणी धोका बनला होता. त्याने काेहलीला आव्हान निर्माण केले होते
 कर्णधार रोहित शर्माचा विश्वास गमावल्याने श्रेयस बाहेर

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरला त्याच्या फ्लॉप परफॉर्मन्समुळे टी-२० विश्वचषकातील मुख्य संघात स्थान मिळालेले नसले, तरी त्याला कर्णधार रोहित शर्माचा विश्वास जिंकण्यात अपयश आल्याचे सांगण्यात येत आहे. कर्णधाराने श्रेयसच्या नावाचा आग्रह धरला नाही म्हणून सिलेक्टर्सनी श्रेयसचा विचार केला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

संघातील विराट कोहलीच्या स्थानासाठी श्रेयस एका क्षणी धोका बनला होता. त्याने काेहलीला आव्हान निर्माण केले होते. परंतु आता निवड समितीने त्याच खेळाडूला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून बाहेर ठेवले आहे.

श्रेयसने कर्णधार रोहितचा विश्वास गमावल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत श्रेयस फ्लॉप ठरला होता. श्रेयसला आशिया चषक २०२२ साठीही मुख्य संघात स्थान मिळाले नव्हते. श्रेयरने गेल्या सहा टी-२० सामन्यांमध्ये ००, २८, ००, १०, २४, ६४ अशा धावा केल्या. या निराशाजनक कामगिरीमुळे तो टी-२० विश्वचषकाच्या मुख्य संघासाठी पात्र ठरू शकला नाही, असे सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in