गिलकडे भारताच्या नेतृत्वाची धुरा? इंग्लंड दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची निवड

भारतीय संघ ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. संघाच्या नेतृत्वाची धुरा कोणत्या खेळाडूच्या खांद्यावर सोपवणार याकडे क्रीडा जगताच्या नजरा लागल्या आहेत. या रेसमध्ये शुभमन गिल आघाडीवर असल्याचे समजते.
गिलकडे भारताच्या नेतृत्वाची धुरा? इंग्लंड दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची निवड
Published on

मुंबई : भारतीय संघ ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. संघाच्या नेतृत्वाची धुरा कोणत्या खेळाडूच्या खांद्यावर सोपवणार याकडे क्रीडा जगताच्या नजरा लागल्या आहेत. या रेसमध्ये शुभमन गिल आघाडीवर असल्याचे समजते.

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंनी अलीकडेच कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी युवा फलंदाज गिल प्रमुख दावेदार असल्याचे समजते. अलीकडे झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जसप्रीत बुमराकडे संघाचे उपकर्णधारपद होते. त्यामुळे कर्णधारपदाचा तो प्रमुख दावेदार मानला जात होता. मात्र फिटनेसमुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते.

ऋषभ पंतसाठी आयपीएलचा यंदाचा हंगाम खराब राहिला असला तरी तो संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. उपकर्णधार म्हणून निवडकर्ते त्याचा विचार करू शकतात.

रोहित आणि विराट नसल्याने भारतीय संघात अनुभवी फलंदाजांची उणीव भासेल. ही कमतरता भरून काढण्याचे काम केएल राहुल करू शकतो. २० जूनपासून लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात राहुल आणि यशस्वी जयस्वाल सलामीला फलंदाजीला येऊ शकतात. साई सुदर्शनला अतिरिक्त सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते. करुण नायर, सरफराज खान आणि श्रेयस अय्यर यांच्यातील एकाला अतिरिक्त फलंदाज म्हणून संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर अनुभ‌वी रवींद्र जडेजावर प्रमुख फिरकीपटू म्हणून विश्वास

ठेवला जाऊ शकतो. तसेच गरजेनुसार अन्य फिरकीपटूला संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान इंग्लंडच्या वेगवान खेळपट्ट्यांवर भारताच्या युवा फलंदाजांचा कस लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in