शुभमन गिलची गुजरात टायटन्सला सोडचिठ्ठी?

गुजरात टायटन्सने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ‘हा प्रवास कायम लक्षात राहील.
शुभमन गिलची गुजरात टायटन्सला सोडचिठ्ठी?

गुजरात टायटन्सने यंदाच्या वर्षी पदार्पणातच विजेतेपदाला गवसणी घातली होती. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने अंतिम फेरीसह गुजरातच्या विजयात चमक दाखवली होती. मात्र सध्या गुजरात टायटन्स आणि शुभमन गिल यांच्यात झालेल्या ट्विटवरून झालेल्या संवादावरून गिल गुजरात टायटन्स सोडणार का, अशी शंका निर्माण झाली आहे. गुजरात टायटन्सने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ‘हा प्रवास कायम लक्षात राहील. शुभमन गिल तुला पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा,’ असे ट्विट केले. याला शुभमन गिलनेही हृदयाचा आणि मिठी मारल्याचा इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली. या संपूर्ण घडामोडींवर एका नेटकऱ्याने हे काय चालले आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने ‘उथप्पाने चेन्नई सुपर किंग्जमधून निवृत्ती पत्करल्यामुळे तिथे पोकळी निर्माण झाली आहे. तसेच गुजरात टायटन्स ही रविंद्र जडेजाची पुढील मोसमासाठीची होम फ्रँचायजी असू शकते. आपण मोठ्या बदलांकडे चाललो आहोत का?’ असा प्रश्न विचारला. शुभमन गिलने आपल्या आयपीएल कारकिर्दिची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्सकडून केली होती. त्यानंतर गुजरातने लिलावापूर्वी गिलला विकत घेतले. त्याने गेल्या हंगामात १६ सामन्यात ४८३ धावा केल्या आहेत. त्याने १३२.३३च्या सरासरीने धावा केल्या. यात त्याच्या टी-२० कारकिर्दितील सर्वोकृष्ट ९६ धावांच्या खेळीचाही समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in