शुभमन पुढील दशकभर वर्चस्व गाजवेल -हेडन

शुभमनने आतापर्यंत कसोटी सामन्यात दोन, एकदिवसीय सामन्यात चार आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक शतके झळकाविली
शुभमन पुढील दशकभर वर्चस्व गाजवेल -हेडन

गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलचे ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडन यांनी कौतुक केले. त्यांनी म्हटले आहे की, ‘‘शुभमन हा फलंदाज पुढील दशकभर जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवेल.’’ दरम्यान, शुभमनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने पंजाबविरूद्धचा सामना जिंकला असला, तरी या सामन्यामध्ये फार धिम्या गतीने खेळ केल्याबद्दल माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. शुभमनने आतापर्यंत कसोटी सामन्यात दोन, एकदिवसीय सामन्यात चार आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक शतके झळकाविली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in