अखेर शुभनमने पार केले नर्व्हस ९० ; 20 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात झळकावले शतक

43व्या षटकात इव्हान्सच्या पहिल्या चेंडूवर गिल त्याच्या पहिल्या शतकाच्या जवळ होता तेव्हा त्याच्याविरुद्ध
Twitter/@DelhiCapitals
Twitter/@DelhiCapitals

भारताचा सलामीवीर शुभमन गिलने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक आज झळकावले. झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याने 82 चेंडूत शतक साजरे केले. गिलने कारकिर्दीतील 20 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावले. 43व्या षटकात इव्हान्सच्या पहिल्या चेंडूवर गिल त्याच्या पहिल्या शतकाच्या जवळ होता तेव्हा त्याच्याविरुद्ध अपील करण्यात आले. पंचांनी अपील फेटाळले. मात्र दुसऱ्या बाजूला इशान किशन धावबाद झाला.

गेल्या काही सामन्यांपासून गिल शानदार फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचे शतक थोडक्यात हुकले होते. गेल्या महिन्यात पोर्ट ऑफ स्पेनमध्ये तो ९८ धावांवर नाबाद राहिला होता. पावसामुळे या सामन्यात षटके कमी करण्यात आली होती. गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत एकूण 205 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेविरुद्धही त्याची चमकदार कामगिरी कायम राहिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in