मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये सिंधू , प्रणॉय आपली लय टिकवून ठेवण्यास उत्सुक

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी सायना नेहवाल, बी. साई प्रणीत यांच्याकडूनही चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये सिंधू , प्रणॉय आपली लय टिकवून ठेवण्यास उत्सुक

स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि एच एस प्रणॉय हे मंगळवारपासून सुर होणाऱ्या मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये भारताच्या मोहिमेला सुरुवात करणार असून आपली लय टिकवून ठेवण्यास उत्सुक आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी सायना नेहवाल, बी. साई प्रणीत यांच्याकडूनही चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.

सिंधू आणि प्रणॉय यांने गेल्या आठवड्यात मलेशिया ओपन सुपर ७५० च्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. आता या दोन्ही खेळाडूंना आपल्या उणिवा दूर करून खेळ करावा लागेल.

सिंधूने यावर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपन सुपर ३३०० मध्ये विजेतेपद मिळविले होते. प्रणॉयला गेल्या पाच वर्षात एकही पदक मिळविता आलेले नाही. पदकांचा हा दुष्काळ संपविण्यास तो आतूर झाला आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारी सिंधू विश्व टूर स्पर्धांच्या उपांत्यपूव आणि उपांत्य सामन्यात अनेकदा पोहोचूनही प्रभावी खेळाडूंपुढे निष्प्रभ ठरली आहे.

अन्य भारतीय खेळाडूंमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी सायना नेहवाल, बी. साई प्रणीत, समीर वर्मा यांच्याबरोबरच त्रिशा जॉली, गायत्री गोपीचंद, अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांच्याकडूनही भारताला मोठ्या अपेक्षा आहेत.

logo
marathi.freepressjournal.in