IPL 2023 : आयपीएल सट्टेबाजीत पैसे गमावल्यानंतर एका ड्रायव्हरने आरसीबीचा गोलंदाज...

जर सिराजने त्याला संघाची आतली गोष्ट सांगितली तर तो खेळाडूला मोठी रक्कम देऊ शकतो
IPL 2023 : आयपीएल सट्टेबाजीत पैसे गमावल्यानंतर एका ड्रायव्हरने आरसीबीचा गोलंदाज...

इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये फिक्सिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आयपीएलचा सध्या सोळावा हंगाम सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वेगवान गोलंदाजाला आयपीएल 2023 मध्ये पैशाचे आमिष दाखवण्यात आले. आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजशी संबंधित मॅच फिक्सिंगचे प्रकरण समोर आले आहे. रिपोर्टनुसार, 'एका ड्रायव्हरने मोहम्मद सिराजशी फोनवर संपर्क साधला आणि त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविषयी आतील माहिती देण्यास सांगितले.' मोहम्मद सिराज यांनी बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ही माहिती दिली आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे.

आयपीएल सट्टेबाजीत पैसे गमावल्यानंतर एका ड्रायव्हरने आरसीबीचा गोलंदाज सिराजकडे जाऊन त्याला संघाची माहिती विचारली. सिराजने बीसीसीआयला फिक्सिंग प्रकरणाची माहिती दिली असून यासंदर्भात चौकशी सुरू आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी बीसीसीआयने कठोर आचारसंहिता तयार केली आहे. कोणत्याही खेळाडूने किंवा अधिकाऱ्याने बुकीशी संपर्क केल्याची माहिती बीसीसीआयला दिली नाही, तर बोर्ड त्याच्यावर कठोर कारवाई करू शकते. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एका ड्रायव्हरने मोहम्मद सिराजला पैशाचे आमिष दाखवले. ड्रायव्हरने सिराजला सांगितले की जर सिराजने त्याला संघाची आतली गोष्ट सांगितली तर तो खेळाडूला मोठी रक्कम देऊ शकतो. मात्र सिराजने या संपूर्ण प्रकरणाची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACU) दिली आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in