आंद्रे रसेलचे लागोपाड सहा चेंडूंवर सहा षटकार

डॉमिनिक ड्रेकच्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर रसेलने सलग षटकार ठोकले.
आंद्रे रसेलचे लागोपाड सहा चेंडूंवर सहा षटकार

वेस्ट इंडिजच्या स्थानिक सिक्स्टी टूर्नामेंटमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळताना कॅरेबियन हार्ड हिटर आंद्रे रसेलने धुवांधार खेळी करत अवघ्या २४ चेंडूत ७२ धावा झोडपून काढल्या. त्याने पाच चौकार आणि आठ षटकार ठोकले. त्याने लागोपाड सहा चेंडूंवर ठोकले सहा षटकार लगावले. सातव्या आणि आठव्या षटकात रसेलने सलग सहा षटकार लगावले.

सेंट किट्ससाठी सातवे षटक टाकणाऱ्या डॉमिनिक ड्रेकच्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर रसेलने सलग षटकार ठोकले. यानंतर जॉन रस जगेजर याच्या पहिल्या दोन चेंडूंवर त्याने सलग दोन षटकार ठोकले. यासह रसेल क्रिकेटच्या इतिहासात सहा चेंडूत सलग सहा षटकार ठोकणाऱ्या मोजक्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या त्रिनबागो नाईट रायडर्सने सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्ससमोर ६० चेंडूत ५ बाद १५६ धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सेंट किट्स संघ निर्धारित षटकांत चार गडी गमावून १५२ धावाच करू शकला.

या सामन्यात शेरफेन रदरफोर्डने १५ चेंडूंत ५० धावा केल्या. पण त्याची खेळी विजय मिळविण्यात तोकडी पडली. फिलिपने शानदार गोलंदाजी केली. दोन षटकात १७ धावांच्या मोबदल्योत तीन बळी टिपले. फिलिपने आंद्रे फ्लेचर (३३), एव्हिन लुईस (७) आणि डेवाल्ड ब्रेव्हिस (०) यांच्या विकेट‌्स मिळविल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in