स्मृती, अर्शदीपला आयसीसी पुरस्काराचे नामांकन

भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला आयसीसी पुरुष टी-२० क्रिकेटर ऑफ द ईअरसाठी आणि सलामीवीर स्मृती मानधनाला आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द ईयरसाठी नामांकन मिळाले आहे.
स्मृती, अर्शदीपला आयसीसी पुरस्काराचे नामांकन
Published on

दुबई : भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला आयसीसी पुरुष टी-२० क्रिकेटर ऑफ द ईअरसाठी आणि सलामीवीर स्मृती मानधनाला आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द ईयरसाठी नामांकन मिळाले आहे.

अर्शदीपने यंदाच्या वर्षात शानदार गोलंदाजी केली आहे. वर्षभरात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो संयुक्तपणे अव्वल स्थानी आहे. तसेच टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये त्याने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आयसीसी पुरुष टी-२० क्रिकेटर ऑफ द ईअरसाठी २५ वर्षीय अर्शदीप सिंगसह पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझम, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅविस हेड आणि झिम्बाम्बेचा सिकंदर रझा हे स्पर्धेत आहेत. या चारही खेळाडूंनी यंदाचे वर्ष गाजवले आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाने यंदाचे वर्ष गाजवले आहे. मानधनासह दक्षिण आफ्रिकेची लाऊरा वॉलवार्ड, श्रीलंकेची चमारी अटापटू आणि ऑस्ट्रेलियाची अनाबेल सुदरलँड हे अनुभवी खेळाडू या रेसमध्ये आहेत.

१८ टी-२० सामन्यांत अर्शदीपने १३.५ च्या सरासरीने सर्वाधिक ३६ विकेट मिळवले आहेत. वर्षभरात टी-२० स्पर्धेत त्याने संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in