म्हणुन टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये मोहम्मद शमी राखीव खेळाडूंमध्ये!

ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धा होण्याच्या कालावधीत उष्ण वातावरण असल्याने खेळपट्टी कोरडी राहू शकते
म्हणुन टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये मोहम्मद शमी राखीव खेळाडूंमध्ये!

ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघामधी १५ खेळाडूंमध्ये शमीचा समावेश नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे; मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यामुळेच मोहम्मद शमीचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला, असे बोलले जात आहे. शमीला मुख्य संघातून वगळणे हा कर्णधार रोहित आणि मुख्य प्रशिक्षक द्रविड यांच्या योजनेचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धा होण्याच्या कालावधीत उष्ण वातावरण असल्याने खेळपट्टी कोरडी राहू शकते. याच कारणामुळे तिथे फिरकी गोलंदाजांना अधिक यश मिळेल, अशी शक्यता रोहित आणि द्रविड यांना वाटत आहे. फिरकी गोलंदाजांमध्ये वैविध्य असल्यास अपेक्षित परिणाम साधला जाईल, असे मत दोघांचेही आहे. निवड समितीसोबतच्या बैठकीशी संबंधित सू त्रांनी इनसाइडस्पोर्टला दिलेल्या माहितीनुसार शमी आणि आर. अश्विनच्या नावावरुन निवडकर्त्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. द्रविड आणि रोहित शर्मा या दोघांनी अश्विनला प्राधान्य दिले. दोघांनीही अश्विन संघात हवा, असे सांगितले, त्यामुळेच निवडकर्त्यांना दोघांचे ऐकावे लागले. दुखापतीमधून सावरलेले वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघामध्ये पुनरागमन झाले आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात कोणताही मोठा बदल निवड समितीने केलेला नाही; मात्र मोहम्मद शमी आणि दीपक चहर या वेगवान गोलंदाजांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. शमीला राखीव खेळाडू ठेवण्याचा निर्णयाने अनेकांना अचंबित केले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये यंदा टी-२० विश्वचषक होणार असल्याने तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणि मैदानांची चाचपणी करून धोरण ठरविण्यासाठी शमीला १५ खेळाडूंमध्ये संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्याचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आल्याने १५ पैकी एखाद्या वेगवान गोलंदाजाला काही दुखापत झाली तरच शमीला खेळण्याची संधी मिळणार आहे. ‘इनसाइडस्पोर्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार म्हटले आहे की, कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक द्रविड यांनी फिरकी गोलंदाजांना प्राधान्य दिले आहे. वेगवेगळ्या शैलीचे फिरकी गोलंदाज संघात असण्यावर या दोघांचे एकमत झाले होते. त्यामुळेच शमीला मूळ संघामध्ये जागा स्थान मिळू शकले नाही. निवड समितीने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी चार वेगवान गोलंदाजांना निवडले. यामध्ये पुनरागमन करणारे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल या दोघांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in