भारतीय एनएससीआय स्नूकर ओपन स्पर्धेत सौरव कोठारीने कोरले नाव

लक्ष्मणने चौथ्या फ्रेममध्ये विजयी ६३ गुणांचा ब्रेक मारला. मात्र, अन्य फे्रममध्ये त्याला खेळ उंचावता आला नाही
भारतीय एनएससीआय स्नूकर ओपन स्पर्धेत सौरव कोठारीने कोरले नाव

जबरदस्त फॉर्मात असलेल्या पीएसपीबीच्या सौरव कोठारीने त्याचाच सहकारी लक्ष्मण रावत याच्यावर ७-२ असा विजय मिळवत नॅशनल स्पोर्ट्स क्‍लब ऑफ इंडिया (एनएससीआय) आयोजित अखिल भारतीय एनएससीआय स्नूकर ओपन (बॉल्कलाइन) स्पर्धेवर नाव कोरले. प्रतिस्पर्ध्यावर त्याने संपूर्णत: वर्चस्व राखले.

एनएससीआय बिलियर्ड्स हॉलमध्ये झालेल्या ६.४ लाख रुपये बक्षिसांच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत शनिवारी कोलकात्याच्या ३७ वर्षीय सौरवने ९५-१७, ३७-७५, ६४-०५, ७--७७, ११६-०१, १२४-०५, ७०-२३, ९१-५०, ७१-३९ अशी बाजी मारली. त्याने पहिल्या फे्रममध्ये ६५, चौथ्या फ्रेममध्ये ५८, पाचव्या फे्रममध्ये ८३ तसेच सहाव्या फ्रेममध्ये शतकी (१०७ गुण) ब्रेक मारताना प्रतिस्पर्ध्यावर पूर्णपणे वर्चस्व राखले. लक्ष्मणने चौथ्या फ्रेममध्ये विजयी ६३ गुणांचा ब्रेक मारला. मात्र, अन्य फे्रममध्ये त्याला खेळ उंचावता आला नाही.

मेलबर्नमध्ये झालेल्या पॅसिफिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्नूकर आणि बिलियर्ड्स अशा दोन्ही प्रकारांत जेतेपद पटकावलेल्या सौरवने एनएससीआय ओपनमध्ये ट्रॉफी मिळवताना गेल्या महिन्यात झालेल्या खार जिमखाना स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील पराभवाचा बदला घेतला. त्याला लक्ष्मणकडून मात खावी लागली होती.

उपांत्य फेरीत रावतने राष्ट्रीय विजेता, महाराष्ट्राच्या ईशप्रीत सिंग चढ्ढा याच्यावर ६-४ असा विजय मिळवला. ईशप्रीतने ७५ गुणांचा ब्रेक करताना धडाकेबाज सुरुवात केली तरी अनुभवी लक्ष्मणने पुढील तीन फ्रेम्स जिंकत २-१ अशी आघाडी घेतली. ईशप्रीतने पुढील दोन फे्रम्स जिंकताना ३-३ अशी बरोबरी साधली. सातवी फ्रेम जिंकून आघाडी घेतली तरी ईशप्रीतला प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखता आले नाही. मात्र, लक्ष्मणने पिछाडी भरून काढताना दोन ब्रेकच्या फरकाने विजय मिळवताना फायनल प्रवेश केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in