दक्षिण आफ्रिका ‘ए’ संघाचा रोमहर्षक विजय; भारत ‘ए’ संघावर ५ विकेट्स राखून सरशी

दक्षिण आफ्रिका ‘ए’ संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी भारत ‘ए’ संघाच्या प्रमुख गोलंदाजांविरुद्ध शानदार फलंदाजी करत दुसऱ्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी रविवारी आपल्या संघाला ५ विकेट राखून विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिका ‘ए’ संघाचा रोमहर्षक विजय; भारत ‘ए’ संघावर ५ विकेट्स राखून सरशी
दक्षिण आफ्रिका ‘ए’ संघाचा रोमहर्षक विजय; भारत ‘ए’ संघावर ५ विकेट्स राखून सरशीPhoto : X
Published on

बंगळूरु : दक्षिण आफ्रिका ‘ए’ संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी भारत ‘ए’ संघाच्या प्रमुख गोलंदाजांविरुद्ध शानदार फलंदाजी करत दुसऱ्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी रविवारी आपल्या संघाला ५ विकेट राखून विजय मिळवून दिला.

भारत ‘ए’ संघाने दिलेले ४१७ धावांचे मोठे लक्ष्य दक्षिण आफ्रिका ‘ए’ संघाने पार केले. आदल्या दिवशी हा संघ २५ धावांवर नाबाद होता. मात्र रविवारी सामन्याच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी करत संघाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला.

जॉर्डन हर्मन (१२३ चेंडूंत ९१ धावा), लेसेगो सेनेक्वाने (१७४ चेंडूंत ७७ धावा), टेम्बा बवुमा (१०१ चेंडूंत ५९ धावा), झुबायर हमझा (८८ चेंडूंत ७७ धावा) आणि कोनोर अस्टरहुईझेन (५४ चेंडूंत नाबाद ५२ धावा) यांनी योगदान देत दक्षिण आफ्रिका ‘ए’ संघाला ३ षटके शिल्लक असताना ४१७ धावांचे लक्ष्य ५ फलंदाज गमावून पार केले. दिवसभरातील ९० षटके पूर्ण झाल्यावर सायंकाळी ५ वाजता सामना थांबवला जातो. मात्र त्याआधी दक्षिण आफ्रिका ‘ए’ संघाने विजयावर मोहोर उमटवली होती. ‘ए’ सामन्यातील हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग आहे.

०-२ अशा फरकाने मालिकेत पराभव टाळण्यासाठी दक्षिण आफ्रिका ‘ए’ संघाला एका दिवसात विजयासाठी ३९२ धावांचा पाठलाग करायचा होता. त्यामुळे पाहुण्या संघाला जिद्दीने मैदानात उतरायचे होते.

सलामीला १५६ धावांची भागिदारी

सलामीवीर हर्मन आणि सेनोक्वानेने आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. सलामीच्या या जोडीने २५८ चेंडूंत १५६ धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला. दिवसाच्या पहिल्या सत्रात या जोडीने २७ षटकांत ११४ धावा केल्या. जेवणापर्यंत पाहुणा संघ १३९ धावांवर बिनबाद होता. अनुभवी भारतीय गोलंदाजांविरुद्ध हर्मन आणि सेनोक्वा यांनी संयमी खेळी खेळली. विशेषतः हर्मनने आकाश दीपच्या गोलंदाजीवर अप्रतिम ड्राइव्ह फटके मारले. दुपारच्या सत्रानंतर काही षटकांतच प्रसिध कृष्णाला झेल देऊन तो बाद झाला.

logo
marathi.freepressjournal.in