दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वन-डे मालिकेतून माघार

भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने वन-डे क्रिकेटचे भवितव्य धोक्यात असल्याचे विधान केले
दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वन-डे मालिकेतून  माघार

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या टी-२० फ्रँचायझी लीग आणि ही वन-डे मालिका एकत्र येत असल्याने दक्षिण आफ्रिकेने जानेवारी २०२३ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वन-डे मालिकेतून माघार घेतली. क्रिकेट साऊथ आफ्रिकेने या वृत्ताला बुधवारी दुजोरा दिला. क्रिकेट चाहते हे टी-२० क्रिकेटकडे जास्त आकर्षित होत आहेत. याचबरोबर कसोटी क्रिकेटचेही पुनरूज्जीवन सुरू झाले आहे. विशेषत: इंग्लंडने चार कसोटी सामने जिंकल्यापासून चाहत्यांचा रस वाढत असल्याचे दिसत आहे. मात्र वन-डे क्रिकेटचे भवितव्य फारसे आशादायक जाणवत नाही. त्यातच आफ्रिकेने ऑस्ट्रेलियातील वन-डे मालिकेतून माघार घेत भर टाकली आहे.

भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने वन-डे क्रिकेटचे भवितव्य धोक्यात असल्याचे विधान केले. त्याने वन-डे सामना सुरू असताना आपण स्वत: टीव्ही बंद करत असल्याचे देखील मान्य केले.अश्विन एका पॉडकास्टमध्ये म्हणाला की, वन-डे क्रिकेटचे वैशिष्ट्य त्यातील चढ - उतार आहे... सॉरी होते. लोक वेळात वेळ काढून सामना शेवटपर्यंत पाहायचे. वन-डे क्रिकेट प्रकारात गोलंदाजांसाठी काहीतरी असायचे. आता जरी मी क्रिकेटवेडा असलो आणि क्रिकेट खेळत असलो तरी वन-डे सामना सुरू असताना मी टीव्ही बंद करतो. यामुळे क्रिकेटच्या वन-डे फॉरमॅटच्या भवितव्याबद्दल भीती वाटते. सामन्यातील चढ-उतार लुप्त झाल्यास ते क्रिकेट राहणार नाही. तो फक्त एक टी-२० क्रिकेटचा वाढलेला फॉरमॅट होऊन जाईल.

अश्विन म्हणाला की, वन-डे क्रिकेटमध्ये एका डावात एकच चेंडू असला पाहिजे. हा प्रासिंगकतेचा प्रश्न आहे. मला असे वाटते की वन-डे क्रिकेटला त्याची प्रासंगिकता शोधावीच लागेल. वन-डे क्रिकेटला त्याची जागा शोधलीच पाहिजे. फिरकीपटूंना फायदा होईल, असे चेंडूबाबतचे काही निर्णय घ्यावे लागतील, ज्यामुळे चेंडू रिव्हर्स स्विंग देखील होईल. खेळासाठी हे खूप गरजेचे आहे.

तो पुढे म्हणाला, आपण २०१० मध्ये जे चेंडू वापरत होतो ते वापरले पाहिजेत. मला नाही वाटत की सध्या आपण ते चेंडू वापरत आहोत. परंतु मी वन-डे क्रिकेट पाहतच लहानाचा मोठा झालो.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in