५० वी जूनियर नॅशनल कबड्डी चॅम्पियनशिप २०२४ हरिद्वारमध्ये होणार!

५० वी जूनियर नॅशनल कबड्डी चॅम्पियनशिप २०२४ हरिद्वार, उत्तराखंड येथे ८ ते ११ जानेवारी दरम्यान होणार असून, भारतातील २४ राज्यस्तरीय मुलं आणि मुलींच्या संघांचा सहभाग असणार आहे. राष्ट्रीय विजेतेपदासाठी खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
५० वी जूनियर नॅशनल कबड्डी चॅम्पियनशिप २०२४ हरिद्वारमध्ये होणार!
Published on

५० वी जूनियर नॅशनल कबड्डी चॅम्पियनशिप २०२४ हरिद्वार, उत्तराखंड येथे ८ ते ११ जानेवारी दरम्यान होणार असून, भारतातील २४ राज्यस्तरीय मुलं आणि मुलींच्या संघांचा सहभाग असणार आहे. राष्ट्रीय विजेतेपदासाठी खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

गेल्या वर्षी ही प्रतिष्ठित स्पर्धा तेलंगणा कबड्डी असोसिएशनने आयोजित केली होती. त्यामध्ये स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAI) संघांनी आपले वर्चस्व सिद्ध केले होते. SAI मुलांच्या संघाने राजस्थान राज्य कबड्डी संघावर, तर SAI मुलींच्या संघाने तामिळनाडू राज्य कबड्डी संघावर विजय मिळवला होता.

या वर्षीच्या स्पर्धेचे आयोजन उत्तराखंड कबड्डी असोसिएशन करत आहे. यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांचा संघ चर्चेत आहे. कर्णधार अनुज गावडे यांच्या नेतृत्वाखालील संघामध्ये ओम कुदळे, आदित्य पिलाने, रोहन तूपारे, समर्थ देशमुख, आणि राज मोरे यांसारखे प्रतिभावान खेळाडू आहेत. आयुब पठाण आणि  वैभव पाटील या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संघ विजेतेपदासाठी सज्ज आहे.

त्याचप्रमाणे मुलींच्या संघामध्ये वैभवी जाधव च्या नेत्तृत्वाखाली भूमिका गोरे, प्रतीक्षा लांडगे,आरती चव्हाण, मोनिका पवार, साक्षी रावडे , सृष्टी मोरे, साक्षी गाइक्वाड, कादंबरी पेडणेकर, श्रेया गवंड, वैष्णवी काळे आणि रेखा राठोड ह्यांचा संघात समावेश झाला आहे. विशेष म्हणजे, यावर्षीची संपूर्ण स्पर्धा स्पोर्टवोट वर थेट प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे कबड्डीप्रेमींना घरबसल्या प्रत्येक सामना थेट पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.

५० वी जूनियर नॅशनल कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये कोण बाजी मारणार? महाराष्ट्र राज्य संघ की गतविजेते SAI संघ? उत्तर शोधण्यासाठी स्पोर्टवोट( SportVot)वर थेट पाहा!

logo
marathi.freepressjournal.in