विश्वचषकासाठी संघ जाहीर; रसुली, सफी या अष्टपैलूंचा संघात समावेश

अफगाणिस्तानचा पहिल्या गटात समावेश असून त्यांना इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या बलाढ्य संघांना सामोरे जायचे आहे
 विश्वचषकासाठी संघ जाहीर; रसुली, सफी या अष्टपैलूंचा संघात समावेश
Published on

१५ सप्टेंबर हा ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याकरता अखेरचा दिवस असल्याने अफगाणिस्ताननेसुद्धा त्यांच्या १५ खेळाडूंची नावे जाहीर केली. या संघात दर्विश रसुली हा लेगस्पिनर आणि सलिम सफी या अष्टपैलूला स्थान देण्यात आले आहे. विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा पहिल्या गटात समावेश असून त्यांना इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या बलाढ्य संघांना सामोरे जायचे आहे.

अफगाणिस्तानचा संघ : मोहम्मद नबी (कर्णधार), नजाबुल्ला झादरान, रहमनुल्ला गुरबाझ, अझ्मतुल्ला ओमरझाई, दर्विश रसुली, फरिद अहमद, फझल हक फारूकी, हझरतुल्ला झझई, इब्राहिम झादरान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, क्वैस अहमद, रशिद खान, सलिम सफी, उस्मान घानी.

logo
marathi.freepressjournal.in