अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये श्रीशंकर ठरला अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू

श्रीशंकरने ब गटातील पात्रता फेरीत आठ मीटरच्या उडीसह दुसरे स्थान पटकाविले आणि एकूण सातवे स्थान पटकाविले.
अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये श्रीशंकर ठरला  अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू

मुरली श्रीशंकर हा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये लांब उडीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये तो दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला. याआधी २०१९ मध्येही त्याने अंतिम फेरी गाठली होती.

श्रीशंकर ८.१५ मीटरचे अंतर पार करू शकला नाही; परंतु त्याने अव्वल १२ खेळाडूंमध्ये स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली.

श्रीशंकरने ब गटातील पात्रता फेरीत आठ मीटरच्या उडीसह दुसरे स्थान पटकाविले आणि एकूण सातवे स्थान पटकाविले. जागतिक अ‍ॅथलेटिक्समध्ये लांब उडी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करून कांस्यपदक जिंकणारी अंजू बॉबी जॉर्ज ही पहिली भारतीय महिला ठरली होती. २००३ मध्ये पॅरिसमध्ये तिने हा पराक्रम केला होता. २३ वर्षीय श्रीशंकरने एप्रिल महिन्यात झालेल्या फेडरेशन कपमध्ये ८.३६ मीटर अंतर कापले होते. यानंतर त्याने ८.३१ मीटर आणि ८.२३ ​​मीटरचे अंतरही पूर्ण केले. पात्रता फेरीत फक्त जपानचा युकी हाशिओका (८.१८ मी) आणि यूएसएचा मार्क्विस डेंडी (८.१६ मी) ८.१५ मीटरपेक्षा जास्त अंतर कापू शकले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in