अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेची बांगलादेशवर ३ धावांनी सरशी

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारून पहिल्या टी-२० लढतीत बांगलादेशला ३ धावांनी नमवले. या विजयासह श्रीलंकेने तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेची बांगलादेशवर ३ धावांनी सरशी

सिल्हेट : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारून पहिल्या टी-२० लढतीत बांगलादेशला ३ धावांनी नमवले. या विजयासह श्रीलंकेने तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ३ बाद २०६ धावांचा डोंगर उभारला. कुशल मेंडिसने ३६ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५९ धावा फटकावल्या, तर सदीरा समरविक्रमाने ८ चौकार व १ षटकारासह ४८ चेंडूंतच नाबाद ६१ धावांचे योगदान दिले. तसेच कर्णधार चरिथ असलंकाने तब्बल ६ षटकारांसह २१ चेंडूंत नाबाद ४४ धावा फटकावल्या.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने २० षटकांत ८ बाद २०३ धावांपर्यंत मजल मारली. जेकर अली (३४ चेंडूंत ६८) आणि रियाद महमदुल्ला (३१ चेंडूंत ५४) यांनी झळकावलेल्या अर्धशतकानंतरही बांगलादेशला थोडक्यात पराभव पत्करावा लागला. अँजेलो मॅथ्यूज व बिनुरा फर्नांडो यांनी दोन बळी मिळवले. अखेरच्या षटकात १२ धावांची गरज असताना दसुन शनाकाने दोन बळी मिळवले व संघाला विजयी केले. असलंकाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in