Asia Cup 2025 : श्रीलंका-बांगलादेश यांच्यात आज जुगलबंदी

आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत शनिवारी श्रीलंका-बांगलादेश यांच्यातील जुगलबंदी चाहत्यांना पाहायला मिळेल. बांगलादेशने ब-गटात हाँगकाँगला नमवून पहिली लढत जिंकली आहे, तर श्रीलंका या लढतीसह आपल्या अभियानास प्रारंभ करेल.
Asia Cup 2025 : श्रीलंका-बांगलादेश यांच्यात आज जुगलबंदी
Published on

अबूधाबी : आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत शनिवारी श्रीलंका-बांगलादेश यांच्यातील जुगलबंदी चाहत्यांना पाहायला मिळेल. बांगलादेशने ब-गटात हाँगकाँगला नमवून पहिली लढत जिंकली आहे, तर श्रीलंका या लढतीसह आपल्या अभियानास प्रारंभ करेल.

लिटन दासच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बांगलादेशने हाँगकाँगला ७ गडी राखून नमवले. १४४ धावांचे लक्ष्य त्यांनी १७.४ षटकांत गाठले. लिटनने ३९ चेंडूंत ५९ धावा फटकावून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

बांगलादेशने गेल्या तीन टी-२० मालिकांमध्ये अनुक्रमे श्रीलंका, पाकिस्तान व नेदरलँड्स यांना पराभूत केले आहे. त्यामुळे ब-गटातून आगेकूच करण्यासाठी त्यांना फेव्हरिट मानले जात आहे.

दुसरीकडे श्रीलंकेचे नेतृत्व चरिथ असंलका करत आहे. गेल्या काही वर्षांपासून बांगलादेश-श्रीलंका यांच्यातील सामने रंगतदार होत असून खेळाडूही एकमेकांना डिवचताना दिसतात. त्यामुळे या लढतीची चाहत्यांना उत्सुकता आहे. असलंकासह मथीशा पाथिरानावर त्यांची भिस्त आहे.

logo
marathi.freepressjournal.in