दुसऱ्या कसोटीत श्रीलंका विजयी; मालिका बरोबरीची

अखेरच्या दिवशी ५०८ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने १ बाद ८९ धावांवरून पुढे सुरुवात केली.
दुसऱ्या कसोटीत श्रीलंका विजयी; मालिका बरोबरीची

प्रभात जयसूर्या (५/११७) आणि रमेश मेंडिस (४/१०१) या डाव्या-उजव्या फिरकीपटूंच्या जोडीने दुसऱ्या डावात केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने पाकिस्तानला दुसऱ्या कसोटीत २४६ धावांनी धूळ चारली. श्रीलंकेच्या विजयामुळे उभय संघांतील दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

अखेरच्या दिवशी ५०८ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने १ बाद ८९ धावांवरून पुढे सुरुवात केली. परंतु त्यांचा दुसरा डाव २६१ धावांवर संपुष्टात आला. कर्णधार बाबर आझम (८१) आणि इमाद उल हक (४९) यांनी पाकिस्तानचा पराभव टाळण्यासाठी कडवा संघर्ष केला; परंतु जयसूर्या-मेंडिस जोडीपुढे त्यांनाही हार मानावी लागली. शतकासह दोन्ही डावांत मिळून १४२ धावा करणारा धनंजया डीसिल्व्हा सामनावीर, तर तीन लढतींमध्ये सर्वाधिक १७ बळी मिळवणारा जयसूर्या मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. उभय संघांतील पहिली कसोटी पाकिस्तानने चार गडी राखून जिंकली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in