श्रीलंकेची शानदार खेळी,पहिल्या डावात ६७ धावांची आघाडी

शनिवारी १५२ धावांची भागीदारी दमदार धावसंख्या उभारण्यास मोठा हातभार लावला होता.
 श्रीलंकेची शानदार खेळी,पहिल्या डावात ६७ धावांची आघाडी

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रविवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा श्रीलंकेने आपल्या पहिल्या डावात सहा गडी बाद ४३१ धावा केल्या होत्या. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरूध्द पहिल्या डावात आतापर्यंत ६७ धावांची आघाडी घेतली आहे. दिनेश चंडिमलने शानदार शतक (२३२ चेंडूंत नाबाद ११८) झळकविले. त्याला कामिंडू मेंडिसने (१३७ चेंडूंत ६१) शानदार साथ दिली. दिनेश चंडिमलसमवेत रमेश मेंडिस ७ धावांवर नाबाद आहे.

कर्णधार दिमुथ करुणारत्ने (१६५ चेंडूंत ८६) आणि कुशल मेंडिस (१५२ चेंडूंत नाबाद ८४) यांनी शनिवारी १५२ धावांची भागीदारी दमदार धावसंख्या उभारण्यास मोठा हातभार लावला होता. नाबाद राहिलेला कुशल मेंडिस रविवारी अवघ्या एका धावेची भर घालून बाद झाला. दिनेश चंडिमलने शानदार नाबाद शतक झळकविताना एक षटकार आणि ९ चौकार लगावले. ॲन्जेलो मॅथ्यूज (११७ चेंडूंत ५२) अर्धशतक झळकावून बाद झाला. त्यानंतर कामिंदू मेंडिसने (१३७ चेंडूंत ६१) अर्धशतकी योगदान दिले.

त्याआधी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६४ धावांत संपुष्टात आला होता. श्रीलंकेच्या पहिल्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली होती. नवव्या षटकात धावफलकावर अवघ्या १२ धावा लागलेल्या असताना पथुम निस्सांका मिशेल स्टार्कच्या गोलंदाचीवर बाद झाला. त्याचा झेल कॅमेरॉन ग्रीनने टिपला. त्यानंतर कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि कुशल मेंडिस यांनी १५२ धावांची भागीदारी केली. ५५ व्या षटकात दिमुथला मिशेल स्वेपसनने पायचीत केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in