अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीवर शाहरुख म्हणाला, "अर्जुनला मैदानात..."

आयपीएल २०२३मध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने पदार्पण करत आपल्या दुसऱ्या सामन्यात पहिली विकेट घेतली.
अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीवर शाहरुख म्हणाला, "अर्जुनला मैदानात..."
Published on

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने विजय मिळवला. यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीची. केकेआरविरुद्ध पदार्पण केल्यानंतर त्याचा हा आयपीएलमधील दुसरा सामना होता. यावेळी त्याने आपल्या दुसऱ्याच सामन्यात पहिली आयपीएलची विकेट घेतली. शिवाय शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करत ५ धावा देऊन मुंबईला विजय मिळवून दिला. त्याने या सामन्यात २.५ षटकांमध्ये १८ धावा देत १ विकेट घेतली. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक झाले.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने देखील अर्जुन तेंडुलकरच्या या कामगिरीचे कौतुक केले. त्याने ट्विट केले की, "आयपीएल कितीही स्पर्धात्मक असली तरीही जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राचा मुलगा अर्जुनला मैदानात उतरुन खेळताना बघता, तेव्हा खूप आनंद होतो. ही नक्कीच एक आनंदाची गोष्ट आहे. अर्जुन तुला खूप खूप शुभेच्छा आणि खरंच सचिन किती अभिमानाचा क्षण आहे हा." असे ट्विट करत अर्जुनला शुभेच्छा दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in