आयपीएलमधील स्टार्स रणजी फेज-२’च्या पहिल्या दिवशी फ्लॉप

आयपीएलमधील स्टार्स रणजी फेज-२’च्या पहिल्या दिवशी फ्लॉप

तब्बल दोन महिन्यांच्या आयपीएलनंतर क्रिकेटनंतर आता रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र, आयपीएलमध्ये चौकार आणि षट्कारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे स्टार्स रणजी फेज-२’च्या पहिल्या दिवशी फ्लॉप ठरले. गुजरातसाठी ४००हून अधिक धावा करणारा गिल नऊ धावांवर बाद झाला. पृथ्वी मयंक, यशस्वी हे स्टारही झटपट गारद झाले.

रणजीचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने सोमवारपासून बंगळुरूच्या अलुरु क्रिकेट स्टेडियमवर सुरू झाले. त्यात बंगाल-झारखंड,मुंबई-उत्तराखंड, कर्नाटक-उत्तर प्रदेश आणि पंजाब-मध्य प्रदेश हे संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या दिवशी पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल आणि मयंक अग्रवाल हे सलामीवीर झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in