राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, अमर हिंद, न्यू इंडिया संघ विजयी

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत दुसऱ्या दिवसाच्या साखळी सामन्यांत पुरुष शहर विभागात न्यू इंडिया इन्शुरन्स, भारत पेट्रोलियम, अमर हिंद या संघांनी दमदार विजय नोंदवले.
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, अमर हिंद, न्यू इंडिया संघ विजयी

मुंबई : राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत दुसऱ्या दिवसाच्या साखळी सामन्यांत पुरुष शहर विभागात न्यू इंडिया इन्शुरन्स, भारत पेट्रोलियम, अमर हिंद या संघांनी दमदार विजय नोंदवले.

न्यू इंडिया संघाने रिझर्व्ह बँकेवर २१-१९ अशी मात केली. कौस्तुभ शिंदेच्या चढाया व ओमकार येनपुरेच्या पकडींच्या बळावर त्यांनी विजय मिळवला. रिझर्व्ह बँकेकडून तुषार शिंदे व रुबेल तेलगरेने चांगला खेळ केला. भारत पेट्रोलियमने माझगाव डॉकला २०-१८ असे दोन गुणांच्या फरकाने नमवले. रोहन पाटील, आदिनाथ गायकवाड यांच्या चढाया व सुनील मल्लईच्या बचावाला याचे श्रेय जाते.

महिलांच्या विभागात ठाण्याच्या ओम वर्तकनगर संघाने स्नेहविकास क्रीडा मंडळाला २५-१३ अशी धूळ चारली. पूजा जाधव, पूर्वा इंगावले यांनी चमक दाखवली. तसेच होतकरू संघाने ओम ज्ञानदीप संघाचा ४५-१४ असा धुव्वा उडवला.

logo
marathi.freepressjournal.in