उपकनिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा: महाराष्ट्राला एकूण सात पदके

दुहेरीत या दोघींनी सुवर्ण जिंकले. मुलींच्या सांघिक गटात महाराष्ट्राने रौप्यपदक मिळवले.
उपकनिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा: महाराष्ट्राला एकूण सात पदके

मुंबई : इंदूर येथे झालेल्या ८५व्या उपकनिष्ठ आणि कॅडेट गटाच्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण ७ पदकांची कमाई केली.

१६ ते २४ जानेवारीदरम्यान झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने २ सुवर्ण, ३ रौप्य व २ कांस्यपदके जिंकली. महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक असणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षक जगदीप भिवंडकर यांनी महाराष्ट्राच्या या दमदार कामगिरीचे कौतुक करतानाच याचे सारे श्रेय हे खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, त्यांचे पालक आणि त्यांच्या शाळांच्या अधिकारी वर्गाना ज्यांनी त्यांना कायम पाठिंबा दिला, त्यांना असल्याचे सांगितले. १५ वर्षांखालील मुलींच्या गटात दिव्यांशी भौमिकने सुवर्ण, काव्या भट्टने रौप्यपदक कमावले. दुहेरीत या दोघींनी सुवर्ण जिंकले. मुलींच्या सांघिक गटात महाराष्ट्राने रौप्यपदक मिळवले. १३ वर्षांखालील मुलींच्या गटात नाईशा रेवस्करने रौप्यपदक प्राप्त केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in