डायव्हिंग नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मुंबईतील खेळाडूंना घवघवीत यश

शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला
 डायव्हिंग नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मुंबईतील खेळाडूंना घवघवीत यश

राजकोट येथे झालेल्या ३८ सब ज्युनियर आणि ४८ ज्युनियर डायव्हिंग नॅशनल चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेमध्ये मुंबईतील खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले. विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

मुलींच्या १८ वर्षा खालील आणि १३ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या संघाने सांघिक विजेतेपद पटकाविले तर मुलांच्या तिन्ही गटात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड च्या संघाने सांघिक विजेतेपदाची ट्रॉफी पटकाविली.

या स्पर्धेत महाराष्ट्राला एकूण ५ सुवर्ण पदके, ७ रौप्य पदक आणि ८ कांस्य पदके मिळाली आहे. या खेळातील काही स्पर्धकांनी विशेष कामगिरीने तिथल्य प्रत्येकाचीच मन जिंकून गोल्डन गर्ल आणि गोल्डन बॉय असे पुरस्कार मिळविले.

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या ४ खेळाडूंची निवड झाली होती. संकुलाची क्षमा बंगेरा हीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत मुलींच्या १८ वर्षा खालील गटात १ मीटर िस्प्रंग बोर्ड डायव्हिंग आणि ३ मीटर िस्प्रंग बोर्ड डायव्हिंग दोन्ही क्रीडा प्रकरात सुवर्ण पदक पटकाविले. वयाच्या १२ वर्षा पासून क्षमा हीने संकुलात डायव्हिंग या खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि ५ वर्षांच्या सततच्या प्रयत्नांनंतर तिने मोठी मजल मारली.

केया प्रभु हीने मुलींच्या १५ वर्षा खालील गटात १मीटर िस्प्रंग बोर्ड डायव्हिंग या प्रकारात रौप्य तर हायबोर्ड डायव्हिंग या प्रकारात कांस्य पदक पटकावले. मुलांच्या १८ वर्षाखालील गटात कबीर राव याने १ मीटर िस्प्रंग बोर्ड डायव्हिंग आणि ३ मीटर िस्प्रंग बोर्ड डायव्हिंग या दोन्ही क्रीडा प्रकारात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड च्य मुलांशी सामना करत कांस्य पदक पटकावले तर स्वराज लाड याने प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन मुलांच्या १३ वर्षा खालील गटात १ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग या प्रकारात कांस्य पदक पटकावले.

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू आणि सचिव डॉ. मोहन राणे यांनी खेळाडूंना नियमित सहकार्य केले. प्रशिक्षक सायली महाडिक आणि तुषार गितये यांनी मार्गदर्शन केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in