Rishabh Pant : ऋषभ पंतच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, डॉक्टरांची मोठी माहिती समोर

30 डिसेंबर रोजी झालेल्या एका भीषण कार अपघातातून पंत थोडक्यात बचावला. पंतवर अंधेरी पश्चिम येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात शस्त्रक्रिया
Rishabh Pant : ऋषभ पंतच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, डॉक्टरांची मोठी माहिती समोर
Published on

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ३० डिसेंबर रोजी झालेल्या एका भीषण कार अपघातातून पंत थोडक्यात बचावला. पंतवर अंधेरी पश्चिम येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. 



दिल्ली-हरिद्वार महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पंतच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतवर डेहराडूनमध्ये त्याच्या अस्थिबंधनावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना मुंबईला आणण्यात आले. याआधी पंतला अनेक दिवस डेहराडूनच्या मॅक्स हॉस्टेलमध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे प्राथमिक उपचार म्हणून त्याच्या शरीराच्या काही भागांवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in