खेलो इंडियामध्ये सुदेष्णा शिवणकरची हॅटट्रीक

३ बाय १०० मीटर धावणे, यामध्ये तिने सुवर्णपदक पटकाविले असून ती सर्वोत्तम धावपटू ठरली
खेलो इंडियामध्ये सुदेष्णा शिवणकरची हॅटट्रीक

हरीयाणा पंचकुला येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम स्पर्धेमध्ये म्हसवड, ता. माण येथील माणदेशी चॅम्पियन्सची सुदेष्णा शिवणकर हिने सलग तीन सुवर्णपदक पटकावून गगनभरारी कामगिरी केली आहे. शिवणकर हिने २०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवून तीन सुवर्णपदक सलग मिळवण्याची किमया साधली आहे. हरियाणाचे मुखमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन तिला गौरविण्यात आले.

या अगोदर ३ बाय १०० मीटर धावणे, यामध्ये तिने सुवर्णपदक पटकाविले असून ती सर्वोत्तम धावपटू ठरली आहे. तिने हे अंतर अवघ्या ११.७९ सेकंदात पार केले आहे, तसेच तिने ४ बाय १०० यामध्येही सुवर्णपदक पटकाविले आहे. १०० मीटरमध्ये सुवर्ण पदक पटकाविल्यामुळे २०० मीटरमध्येही तिने पदक मिळवावे अशी अपेक्षा सगळ्यांना होती आणि तिने सगळ्यांचा विश्वास सार्थ ठरवत २०० मीटरमध्ये गतवर्षाची वेगवान धावपटू अवंतिका नरळे हिला मागे टाकत हे सुवर्णपदक पटकाविले. २०० मीटर अंतर तिने २४.२९ सेकंदात धावून पूर्ण केले. सुदेष्णा शिवणकर हिने या स्पर्धेमध्ये सलग तीन सुवर्णपदक पटकावून संपूर्ण भारतामध्ये माणदेशासह महाराष्ट्राचे व सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. सुदेष्णा शिवणकर व संपूर्ण माणदेशी चॅम्पियन्सची संपूर्ण टीम, कोचेस यांनी तिचे अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in