सुंदर पिचाई, मुकेश अंबानी यांचे क्रिकेटवर अतोनात प्रेम - रवी शास्त्री

रवी शास्त्री आता पुन्हा एकदा समालोचनाकडे वळले आहेत. ते सध्या स्काय स्पोर्ट्ससाठी समोलोचन करीत आहेत
सुंदर पिचाई, मुकेश अंबानी यांचे क्रिकेटवर अतोनात प्रेम - रवी शास्त्री

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि भारतातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी ही दोन जबरदस्त व्यक्तिमत्त्वे क्रिकेटवर खूप प्रेम करतात, असे कॅप्शन देत एक फोटो भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि समालोचक रवी शास्त्री यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला. दरम्यान, रवी शास्त्रींच्या या फोटोवर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसनने देखील प्रतिक्रिया दिली. त्याने खास इमोजी शेअर करत फोटो ‘जबरदस्त’ असल्याचे सांगितले.

रवी शास्त्री आता पुन्हा एकदा समालोचनाकडे वळले आहेत. ते सध्या स्काय स्पोर्ट्ससाठी समोलोचन करीत आहेत. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेत समालोचन करीत असताना लॉर्ड्सवरील सामन्यात रवी शास्त्रींची सुंदर पिचाई आणि मुकेश अंबानी यांच्याशी भेट झाली. या भेटीचा फोटो रवी शास्त्रींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in