Sunil Chhetri : फोटोजिवी राज्यपालांचा व्हिडीओ व्हायरल ; माफीची मागणी

बेंगळुरू एफसीने मुंबई सिटी एफसीचा २-१ असा पराभव करत ड्युरंड कप जिंकला. पण या सामन्यापेक्षाही जास्त चर्चा झाली ती सादरीकरण सोहळ्यातील एका घटनेची
Sunil Chhetri : फोटोजिवी राज्यपालांचा व्हिडीओ व्हायरल ; माफीची मागणी

रविवारी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर ड्युरंड कपचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात बेंगळुरू एफसीने मुंबई सिटी एफसीचा २-१ असा पराभव करत ड्युरंड कप जिंकला. पण या सामन्यापेक्षाही जास्त चर्चा झाली ती सादरीकरण सोहळ्यातील एका घटनेची. या घटनेचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

बेंगळुरू एफसीचा कर्णधार सुनील छेत्री सामन्यानंतर सादरीकरण समारंभात स्टेजवर दिसत आहे. यावेळी विजेत्या कर्णधार सुनील छेत्रीला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यानंतर एक फोटो सेशन झाले, या फोटो सेशनमध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल एल. गणेशन फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. यावेळी गणेशनने छेत्रीला थोडे मागे ढकलल्याचे दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेमुळे चाहतेही प्रचंड संतापले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. केवळ चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओवर टिप्पणी करताना माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने लिहिले, "हे लज्जास्पद आहे. 

काही चाहत्यांनी लिहिले, 'कसले वर्तन? सुनील छेत्री एक खेळाडू आहे. खेळाडूचा आदर करणे महत्त्वाचे आहे. त्याने सुनील छेत्री आणि भारतीय फुटबॉलची माफी मागितली पाहिजे. '" असे चाहत्यांनी सांगितले. दरम्यान, अंतिम सामन्यात बेंगळुरूने मुंबईचा 2-1 असा पराभव केला. 

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in