लिटिल मास्टर हार्दिक पांड्यावर भडकले; म्हणाले...

सुनील गावसकर हे गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या वर्तुवणूकीव नाराज झाल्याचं दिसत आहेत.
लिटिल मास्टर हार्दिक पांड्यावर भडकले; म्हणाले...

आयपीएलच्या 16 व्या हंगामातील महाअंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आमि गुजरात टायटन्स यांच्यात आहे. 28 मे रोजी गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार होता. मात्र, पाऊस सुरु असल्याने सामना होऊ शकला नाही. या सामन्याचा राखीव दिवस 29 मे असून राखीव दिवशी या सामन्याचा विजेता ठरवला जाईल.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम.एस धोनीची ही शेवटी आयपीएल असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे चेन्नईचे खेळाडू धोनीला विजयीनिरोप देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यापुर्वी भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर हे गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या वर्तुवणूकीव नाराज झाल्याचं दिसत आहेत.

गावस्कर हे आयपीएलचं प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स या वाहिनीशी बोलत असताना त्यांना हार्दिक व धोनी यांची काही चित्रे दाखवण्यात आली. त्यात हार्दिक धोनीच्या गळ्यात हात टाकताना दिसत आहेत. गावस्कर यांनी या फोटोंवर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "हार्दिक व माही यांच्यातील नाते चांगले आहे. मात्र हार्दिकने माहीला थोडा सन्मान देणे गरजेचे आहे. धोनी हा खूप महान खेळाडू असून हार्दिकचे धोनीच्या गळ्यात हात टाकणं शोभत नाही. तुम्ही तुमच्या वडिलधाऱ्या असणाऱ्या वडिलांच्या, काकांच्या गळ्यात असा हात टाकता का? मला ही गोष्ट थोडीशी खटकते. आमच्या काळात या गोष्टी होत नसत. मात्र, आता खेळाडूंमधील ऋणानुबंध लवकर वृद्धिंगत होतात. तसेच त्यांची संभाषण करण्याती पद्धत बदली असल्यानेच कदाचित एवढ सगळ पटक होत असेल", असे ते म्हणाले आहेत.

पुढे बोलताना गावस्कर म्हणाले की, "मागील वर्षी तो पहिल्यांदा कर्णधार झाला तेव्हा काय अपेक्षा करावी याची कोणालाच कल्पना नव्हती. कारण तो शांत क्रिकेटपटू नव्हता. गेल्या वर्षभरता आपण पाहतोय की तो संघात जी शांतता आणतोय तो धोनीची आठवण करुन देतो. हा संघ चेन्नई प्रमाणेच आनंदी आहे. यासाठी हार्दिक श्रेयास पात्र आहे. मात्र, त्याने मोठ्या व्यक्तींशी आदमीने, योग्य सन्मान राखून बोलायला हवं, तुम्ही कितीही मोठे व्हा, पण तुमच्यातील नम्रता कधीही कमी होऊ देऊ नका. हेच गुण तुम्हाला पुढे नेतील", असे गावसकर यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in