नरिन, रघुवंशी यांचा झंझावात; कोलकाताचा २७२ धावांचा डोंगर

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नरिन आणि फिल सॉल्ट यांनी पॉवरप्लेमध्येच ८८ धावा फलकावर लावल्या. सॉल्ट १८ धावांवर बाद झाला. मात्र नरिनने ७ चौकार व ७ षटकारांसह हंगामातील पहिले अर्धशतक साकारले. त्याला १८ वर्षीय रघुवंशीने उत्तम साथ दिली.
नरिन, रघुवंशी यांचा झंझावात; कोलकाताचा २७२ धावांचा डोंगर

विशाखापट्टमण : सुनील नरिन (३९ चेंडूंत ८५ धावा) आणि मुंबईकर अंक्रिश रघुवंशी (२७ चेंडूंत ५४) या दोघांनी साकारलेल्या घणाघाती खेळीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने बुधवारी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २० षटकांत ७ बाद २७२ धावांचा डोंगर उभारला. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. काही दिवसांपूर्वीच हैदराबादने मुंबईविरुद्ध २७७ धावांचा विक्रम नोंदवला होता.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नरिन आणि फिल सॉल्ट यांनी पॉवरप्लेमध्येच ८८ धावा फलकावर लावल्या. सॉल्ट १८ धावांवर बाद झाला. मात्र नरिनने ७ चौकार व ७ षटकारांसह हंगामातील पहिले अर्धशतक साकारले. त्याला १८ वर्षीय रघुवंशीने उत्तम साथ दिली. पदार्पणाच्याच लढतीत रघुवंशीने ५ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक झळकावले. नरिन व रघुवंशी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी रचली. हे दोघे बाद झाल्यावर आंद्रे रसेल (१९ चेंडूंत ४१) आणि रिंकू सिंग (८ चेंडूंत २६) यांनीही फटकेबाजी केल्यामुळे कोलकाताने अडीचशे धावांचा टप्पा गाठला. कर्णधार श्रेयस अय्यरने ११ चेंडूंत १८ धावा केल्या. दिल्लीकडून आनरिख नॉर्किएने सर्वाधिक तीन बळी मिळवले. मात्र त्यानेच ४ षटकांत सर्वाधिक ५९ धावा लुटल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in