
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या प्रशासक नियुक्तीबाबत नोटीस जारी करून आजच्या तारखेप्रमाणे स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे, माननीय मुंबई खंडपीठ, बॉम्बे उच्च न्यायालयाने नेमलेला प्रशासक आता पुढील आदेशापर्यंत पदभार स्वीकारू शकत नाही किंवा नव्या निवडणुका घेऊ शकत नाही.
उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेली विशेष परवानगी याचिका सोमिरन शर्मा, गणेश गाढे आणि अरुण फाजगे यांच्या माध्यमातून माननीय सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. प्रकरणाच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आजची स्थिती कायम ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला आहे.
सोमिरन शर्मा यांनी नमूद केले की, आजच्या तारखेपर्यंत प्रशासकांनी असोसिएशनचा पदभार स्वीकारलेला नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे आता प्रशासकांना पदभार स्वीकारण्यास किंवा कोणतीही निवडणूक प्रक्रिया राबविण्यास प्रतिबंध आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, या निवडणुका राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेच्या अनुषंगानेच झालेल्या आहेत.