मॉडेल तानिया सिंगने केली आत्महत्या, 'लास्ट कॉल' मुळे IPL क्रिकेटपटूची होणार चौकशी

मॉडेलने आत्महत्या केल्याप्रकरणी सनरायझर्स हैदराबाद संघाचा खेळाडू अभिषेक शर्माला पोलिसांनी समन्स पाठवलं आहे.
Abhishek Sharma And Tania Singh
Abhishek Sharma And Tania Singh

आयपीएलचा १७ वा हंगाम सुरु होण्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आलीय. सूरत येथील एका मॉडेलने आत्महत्या केल्याप्रकरणी सनरायझर्स हैदराबाद संघाचा खेळाडू अभिषेक शर्माला पोलिसांनी समन्स पाठवलं आहे. तानिया सिंग असं या मॉडेलचं नाव असून तिने सोमवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबतचं वृत्त गुजरात तकने प्रसिद्ध केलं आहे.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तानिया सिंगने आत्महत्या करण्यापूर्वी शेवटचा कॉल अभिषेकला केला होता. या दोघांमध्ये काहीतरी गुपित असल्याचा संशय पोलिसांना असल्याने अभिषेकला समन्स पाठवण्यात आल्याचं समजते. सोमवारी रात्री उशिरा तानियाने स्वत:ला संपवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या कुटुंबियांना तानियाचा मृतदेह आढळला.

दरम्यान, अभिषेक शर्मा २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आयपीएलमध्ये खेळत होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्याने सनरायझर्स संघासोबत करार केला. अभिषेकने आयपीएलच्या ४७ सामन्यांमध्ये २२.८७ सरासरीने ८९२ धावा कुटल्या आहेत. तसंच १३७.२३ च्या स्ट्राईक रेटने त्याने चार अर्धशतकही ठोकले आहेत. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी केलीय. २४ फर्स्ट क्लास क्रिकेटचे सामने आणि लिस्ट ए च्या ५३ सामने खेळून २ हजारहून अधिक धावा त्याने केल्या आहेत. अभिषेकने २०१६ मध्ये १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करुन आशिया कपही जिंकवून दिला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in