सूर्यकुमार यादवची फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण

आगामी आशिया चषक स्पर्धेआधी भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने फिटनेस चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली.
सूर्यकुमार यादवची फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण
Photo : X (@Sportskeeda)
Published on

नवी दिल्ली : आगामी आशिया चषक स्पर्धेआधी भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने फिटनेस चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली.

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. या निवडीआधी सूर्यकुमार यादवने बंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली.

भारताच्या या विस्फोटक फलंदाजावर जून महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर मैदानात पुनरागमन करण्यापूर्वी फिटनेस चाचणी करावी लागते. सूर्यकुमारने ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

शस्त्रक्रियेनंतर सूर्यकुमारने सोशल मीडियावर पोस्ट करत या शस्त्रक्रियेची माहिती दिली होती.

logo
marathi.freepressjournal.in