सूर्यकुमारसह चौघे भारतीय आयसीसीच्या टी-२० संघात

आयसीसीने सोमवारी २०२३ या वर्षातील कामगिरीच्या आढाव्यावर पुरुष व महिलांच्या टी-२० संघांची घोषणा केली.
सूर्यकुमारसह चौघे भारतीय आयसीसीच्या टी-२० संघात

दुबई : धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवची आयसीसीच्या २०२३ या वर्षातील टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. सूर्यकुमारसह भारताच्या एकूण चार जणांना या संघात स्थान लाभले आहे. त्यामध्ये मुंबईकर सलामीवीर यशस्वी जैस्वाल, फिरकीपटू रवी बिश्नोई आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे.

आयसीसीने सोमवारी २०२३ या वर्षातील कामगिरीच्या आढाव्यावर पुरुष व महिलांच्या टी-२० संघांची घोषणा केली. सूर्यकुमारने या वर्षातही जागतिक क्रमवारीत अग्रस्थान कायम राखताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताचे ४-१ असे यशस्वी नेतृत्व केले. त्याला वर्षातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठीही नामांकन लाभले आहे. दुसरीकडे, यशस्वीने वर्षभरात सातत्यपूर्ण कामगिरी केली. बिश्नोईने काही काळासाठी क्रमवारीत अग्रस्थान काबिज केले. तसेच अर्शदीपने गोलंदाजीत लक्ष वेधले.

महिला संघांत भारताच्या फक्त अष्टपैलू दीप्ती शर्माला स्थान लाभले आहे. श्रीलंकेची चामरा अटापटू या संघाची कर्णधार असून त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ४ खेळाडू आहेत.

आयसीसीचा टी-२० संघ (पुरुष) : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, फिल सॉल्ट, निकोलस पूरन, मार्क चॅपमन, सिकंदर रझा, अल्पेश रामजानी, मार्क अडेर, रवी बिश्नोई, रिचर्ड एन्गरवा, अर्शदीप सिंग.

आयसीसीचा टी-२० संघ (महिला) : चामरी अटापटू (कर्णधार), बेथ मूनी, लॉरा वॉल्वर्ड, हीली मॅथ्यूज, नॅट शीव्हर-ब्रंट, अमेलिया कर, एलिस पेरी, ॲश्लेघ गार्डनर, दीप्ती शर्मा, सोफी एक्केलस्टन, मेगान शूट.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in