आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत सूर्यकुमार यादव चमकला

आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत सूर्यकुमार यादव चमकला

सूर्यकुमार यादवसोबतच विराट कोहलीला शानदार कामगिरीचा फायदा झाला; तर कर्णधार रोहित शर्माने आपले स्थान कायम राखले
Published on

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात ३६ चेंडूंत ६९० धावांची धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत दुसरे स्थान पटकाविले.

सूर्यकुमार यादवसोबतच विराट कोहलीला शानदार कामगिरीचा फायदा झाला; तर कर्णधार रोहित शर्माने आपले स्थान कायम राखले. रोहितने आपले स्थान कायम राखले, तर विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा झाला. सूर्यकुमारचे एकूण ८०१ रेटिंग्स पॉइंट्स झाले. त्याने हैदराबादमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात विजयी खेळी साकारली. भारताने या जोरावर २-१ने मालिका जिंकली. सूर्यकुमारने याआधीही दुसरे स्थान पटकाविले होते. ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार कामगिरी करत त्याने दुसरे स्थान मिळविले होते. रोहित तेराव्या स्थानी कायम राहिला. विराट १५व्या क्रमांकावर पोहोचला. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यात अनुक्रमे ११, ४६ आणि १७ धावा केल्या होत्या.

logo
marathi.freepressjournal.in