न्यूझीलंड दौऱ्यासाठी सूर्यांश शेडगेच्या नावाची चर्चा

मुंबईचा वेगवान गोलंदाज तसेच अष्टपैलू क्रिकेटपटू सूर्यांश शेडगे याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघात प्रथमच संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी सूर्यांश शेडगेच्या नावाची चर्चा
न्यूझीलंड दौऱ्यासाठी सूर्यांश शेडगेच्या नावाची चर्चाX
Published on: 

नवी दिल्ली : मुंबईचा वेगवान गोलंदाज तसेच अष्टपैलू क्रिकेटपटू सूर्यांश शेडगे याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघात प्रथमच संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध नुकत्याच झालेल्या अनधिकृत एकदिवसीय मालिकेतील प्रभावी कामगिरीमुळे त्याने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे.

अवघ्या २३ वर्षांच्या शेडगेने इंग्लंड दौऱ्यात भारताकडून तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पुद्दुचेरी येथे ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत छाप पाडली. पहिल्या सामन्यात त्याने अचूक वेगवान गोलंदाजीच्या जोरावर चार बळी घेतले होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in