टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये स्वित्झर्लंडने सामना एक विकेटने जिंकला

टी-२० मध्ये सर्वात तरुण शतकाचा विक्रम अफगाणिस्तानच्या हजरतुल्ला जझाईच्या नावावर होता.
टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये स्वित्झर्लंडने सामना एक विकेटने जिंकला

फ्रान्सचा सलामीवीर गुस्ताव्ह मॅककोन हा टी-२०मध्ये शतक झळकाविणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. टी-२० विश्वचषक २०२४च्या युरोपियन क्वालिफायर सामन्यात त्याने स्वित्झर्लंडविरुद्ध ही कामगिरी केली. दरम्यान, गुस्तावचे शतक व्यर्थ ठरले. स्वित्झर्लंडने हा सामना एका विकेटने जिंकला. या सामन्यात फ्रान्सने प्रथम फलंदाजी करताना २० षट्कांत पाच गडी गमावून १५७ धावा केल्या. स्वित्झर्लंडने ९ विकेट्सच्या मोबदल्यात १५८ धावा करून लक्ष्य गाठले. स्वित्झर्लंडकडून कर्णधार फहीम नाझीरने ४६ चेंडूत ६७ धावा केल्या.

१८ वर्षे २८० दिवसांच्या गुस्तावने ६१ चेंडूत १०९ धावांची खेळी खेळली केली. त्याने पाच चौकार आणि नऊ षट्कार लगावले. हा त्याचा दुसरा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने झेक प्रजासत्ताकविरुद्ध पदार्पणाच्या टी-२० मध्ये ५४ चेंडूत ७६ धावा केल्या होत्या.

टी-२० मध्ये सर्वात तरुण शतकाचा विक्रम अफगाणिस्तानच्या हजरतुल्ला जझाईच्या नावावर होता. अफगाणिस्तानचा सलामीवीर जझाईने २०१९मध्ये आयर्लंडविरुद्ध २० वर्षे ३३७ दिवसांचा असताना शतक झळकाविले होते. जझाईने अवघ्या ६२ चेंडूत नाबाद १६२ धावा केल्या होत्या.

फ्रान्सचा सलामीवीर गुस्तावने वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. स्वित्झर्लंडकडून अली नय्यरने दोन बळी टिपले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in