सूर्यकुमार मुंबईचा कर्णधार; शार्दूल, शिवमचाही समावेश; मुश्ताक अली टी-२० स्पर्धा १४ नोव्हेंबरपासून

भारताचा माजी विश्वविजेता टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवचे आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघात पुनरागमन झाले असून त्याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सूर्यकुमार मुंबईचा कर्णधार; शार्दूल, शिवमचाही समावेश; मुश्ताक अली टी-२० स्पर्धा १४ नोव्हेंबरपासून
Published on: 

मुंबई : भारताचा माजी विश्वविजेता टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवचे आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघात पुनरागमन झाले असून त्याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सोमवारी ही घोषणा केली. रणजी स्पर्धेचा पहिला टप्पा संपल्यानंतर आता शनिवार, १४ नोव्हेंबरपासून देशभरात मुश्ताक अली स्पर्धा रंगणार आहे. मुंबईचा समावेश ड-गटात करण्यात आला असून या गटात छत्तीसगड, गोवा, गुजरात, हैदराबाद, ओदिशा, उत्तराखंड, विदर्भ हे संघही आहेत.

रणजी स्पर्धेच्या पहिल्या चार लढतींसाठी सूर्यकुमारची निवड झाली नव्हती. तसेच सूर्यकुमारने भारताच्या संघातील स्थानही गमावले आहे. मात्र, श्रेयस अय्यर उपलब्ध नसल्यास मर्यादित षटकांच्या स्पर्धांमध्ये नेतृत्व मुंबईचे सूर्यकुमारकडे सोपवले जाण्याची शक्यता होती. अखेर त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कर्णधारपदा मिळाल्यानंतर सूर्यकुमारने आनंद व्यक्त केला.

या संघात अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे आणि शार्दूल ठाकूर यांचाही समावेश आहे. हाताच्या दुखापतीतून सावरणाऱ्या शार्दूलचे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये दोन महिन्यांनी पुनरागमन होणार आहे.

मुंबईचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अंक्रिश रघुवंशी, दिव्यांश सक्सेना, सुवेद पारकर, मुशीर खान, सर्फराझ खान, साईराज पाटील, शिवम दुबे, अथर्व अंकोलेकर, शम्स मुलाणी, मॅक्सवेल स्वामीनाथन, तुषार देशपांडे, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, सेल्व्हेस्टर डिसोझा, हार्दिक तामोरे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)