कसोटी क्रिकेटसाठी टी-२० घातक - एबी डिव्हिलियर्स

सर्व खेळाडू पैशांमागे धावू लागल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने दुय्यम संघ निवडला आहे
कसोटी क्रिकेटसाठी टी-२० घातक - एबी डिव्हिलियर्स

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केवळ दोन कसोटी सामन्यांची मालिका असल्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स नाराज आहे. टी-२० क्रिकेटमु‌ळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा कसोटी सामना होऊ शकला नाही. टी-२० मुळे कसोटी क्रिकेटवर दडपण आहे. टी-२० मुळेच कसोटी क्रिकेट धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी बदल करण्याची गरज आहे, असे मतही त्याने व्यक्त केले.

न्यूझीलंडच्या आफ्रिका दौऱ्यावर केवळ दोनच कसोटी खेळणे त्याला योग्य वाटत नाही. डिव्हिलियर्सने म्हटले की, “भारत आणि आफ्रिकेदरम्यान तिसरी कसोटी होणार नसल्याने मी निराश झालो आहे. यासाठी जगभरात सुरू असलेल्या टी-२० क्रिकेटला जबाबदार धरावे लागेल. मात्र, या परिस्थितीला जबाबदार कोण, हे मला माहित नाही. पण काहीतरी गडबड नक्कीच आहे, हे मला समजते.”

“आता केवळ कसोटी क्रिकेटच नव्हे तर एकदिवसीय क्रिकेटचेही दडपण आहे. संपूर्ण यंत्रणा टी-२० क्रिकेटभोवती फिरत आहे. खेळाडू, विविध देशाची क्रिकेट मंडळे आणि प्रशिक्षक सर्व पैसा आहेत, त्याच ठिकाणी जात आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये स्पर्धा पाहायची असेल, तर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचे नियम बदलावे लागतील. संघांमधील मालिकेत २ पेक्षा जास्त कसोटी असाव्यात,” अशा शब्दांत डिव्हिलियर्सने धोक्याचा इशारा दिला आहे.

“केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यातील खेळपट्टीचे वर्णन डिव्हिलियर्सने केले. तो म्हणाला, “माझ्या केपटाऊनची खेळपट्टी योग्य होती. बेन स्टोक्सने केपटाऊनमध्ये द्विशतक झळकावले आहे. मी स्वत: तिथे काही शतके झळकावली आहेत. अशा खेळपट्टीवर तुम्हाला गोलंदाजांवर दबाव आणणे आवश्यक आहे. फिलँडर, बुमराह, सिराज, रबाडा यांसारख्या गोलंदाजांना तुम्ही त्यांच्या इच्छेनुसार गोलंदाजी करू देऊ शकत नाही.”

न्यूझीलंड दौऱ्यासाठी आफ्रिकेचा दुय्यम संघ

सर्व खेळाडू पैशांमागे धावू लागल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने दुय्यम संघ निवडला आहे. यावरही डिव्हिलियर्सने ताशेरे ओढले. संघनिवडीमुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला टीकेचे धनी व्हावे लागले आहे. “पैसा आहेत तिथेच खेळण्याकडे खेळाडूंचा कल आहे. आपल्या कुटुंबियाचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या हेतूने खेळाडू पैशांकडे धावत आहेत. त्यामुळे त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही,” असेही डिव्हिलियर्सने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in