
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला आज मंगळवारपासून सुरुवात होत आहे. पहिला टी-२० सामना मुंबईत होणार आहे. सामना सुरू होण्यासाठी काही तास बाकी असताना भारतीय संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने संघात सध्याच्या सर्वात घातक गोलंदाजाची निवड केली आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघ एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. या मालिकेसाठी बीसीसीआयने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा संघात समावेश केला आहे. 10, 12 आणि 15 जानेवारी दरम्यान दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिकेत सामने खेळले जातील.
पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह सप्टेंबर 2022 पासून संघातून बाहेर होता. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकालाही तो मुकला होता. बुमराहला एनसीएने फिट घोषित केले केल्याने आता तो वनडे मालिकेसाठी संघात असेल.