श्रीलंकेचा हसरंगा, न्यूझीलंडचा ब्रेसवेल स्पर्धेबाहेर; मार्शही जायबंदी; टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळाडू दुखापतग्रस्त होण्याची

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळाडू एकामागून एक जायबंदी होण्याची अथवा आजारी होण्याची मालिका सुरूच आहे. यामध्ये आता श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, न्यूझीलंडचा मिचेल ब्रेसवेल यांची भर पडली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शही पहिल्या लढतीला मुकल्याने स्टीव्ह स्मिथला पाचारण करण्यात आले आहे. भारताच्या इशान किशनलासुद्धा बुधवारी रात्री सरावात बुमराचा चेंडू पायाला लागल्याचे समजते.
श्रीलंकेचा हसरंगा, न्यूझीलंडचा ब्रेसवेल स्पर्धेबाहेर; मार्शही जायबंदी; टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळाडू दुखापतग्रस्त होण्याची मालिका कायम
श्रीलंकेचा हसरंगा, न्यूझीलंडचा ब्रेसवेल स्पर्धेबाहेर; मार्शही जायबंदी; टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळाडू दुखापतग्रस्त होण्याची मालिका कायम
Published on

मुंबई : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळाडू एकामागून एक जायबंदी होण्याची अथवा आजारी होण्याची मालिका सुरूच आहे. यामध्ये आता श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, न्यूझीलंडचा मिचेल ब्रेसवेल यांची भर पडली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शही पहिल्या लढतीला मुकल्याने स्टीव्ह स्मिथला पाचारण करण्यात आले आहे. भारताच्या इशान किशनलासुद्धा बुधवारी रात्री सरावात बुमराचा चेंडू पायाला लागल्याचे समजते.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

या स्पर्धेत अ-गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया यांचा समावेश आहे. ब-गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान हे संघ आहेत. क-गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ, इटली, स्कॉटलंड यांना स्थान देण्यात आले आहे, तर ड-गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ सुपर-आठ फेरीत दाखल होतील. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार केले जातील. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. ७ मार्चला अंतिम सामना खेळवण्यात येईल.

दरम्यान, हसरंगाला पहिल्या लढतीत दुखापत झाली. त्यामुळे दुश्मत हेमंताची श्रीलंकेच्या संघात निवड करण्यात आली आहे. अमिराती व कॅनडा संघातील काही खेळाडूही जायबंदी आहेत. इतकेच नव्हे, तर सुंदर व बुमरा हे खेळाडूसुद्धा विविध कारणामुळे भारताच्या पहिल्या लढतीसाठी अनुपलब्ध होते. आता अभिषेकही आजारी असल्याने त्याच्याविषयी संभ्रम आहे. आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगही बुधवारी लढतीदरम्यान अवघा एक चेंडू खेळून माघारी परतला.

न्यूझीलंडने ब्रेसवेलच्या जागी अद्याप पर्यायी खेळाडू निवडलेला नाही. आधीच मिल्ने बाहेर गेल्यामुळे त्यांना कायले जेमिसनची निवड करावी लागली होती. ऑस्ट्रेलियाने जोश हेझलवूड व पॅट कमिन्स या वेगवान गोलंदाजांना विश्वचषकापूर्वीच दुखापतीमुळे गमावले. आता मार्शही पूर्ण स्पर्धेच्या बाहेर गेल्यास ऑस्ट्रेलियापुढील आव्हानांत वाढ होईल. त्यामुळेच त्यांनी स्मिथचा संघात समावेश केला आहे. एकूणच विश्वचषकात खेळाडूंचा कस लागत आहे.

logo
marathi.freepressjournal.in