टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : न्यूझीलंडचा संघ घोषित; कॉन्वेचा समावेश

आगामी टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंडने त्यांचा १५ सदस्यीय संघ सोमवारी जाहीर केला.
टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : न्यूझीलंडचा संघ घोषित; कॉन्वेचा समावेश
Published on

वेलिंग्टन : आगामी टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंडने त्यांचा १५ सदस्यीय संघ सोमवारी जाहीर केला. केन विल्यम्सन या संघाचे नेतृत्व करणार असून कारकीर्दीत चौथ्यांदा तो टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडचे कर्णधारपद भूषवेल.

डावखुऱ्या डेवॉन कॉन्वेचा संघात समावेश करण्यात आला आहे. कॉन्वे हाताच्या दुखापतीमुळे आयपीएलमध्ये सहभागी झालेला नाही. त्याशिवाय रचिन रवींद्र आणि मॅट हेन्री यांना प्रथमच टी-२० विश्वचषक खेळण्याची संधी मिळणार आहे. विल्यम्सनचा हा खेळाडू म्हणून हा एकंदर सहावा टी-२० विश्वचषक असेल. तर अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊदी कारकीर्दीतील सातवा विश्वचषक खेळेल. न्यूझीलंडव्यतिरिक्त अद्याप कोणत्याही संघाने १५ खेळाडू जाहीर केलेले नाहीत. यंदा २० संघ टी-२० विश्वचषकात सहभागी होणार असून त्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. न्यूझीलंडचा क-गटात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वेस्ट इंडिज, अफगाणिस्तानसुद्धा आहेत.

न्यूझीलंडचा संघ

केन विल्यम्सन (कर्णधार), फिन एलन, ट्रेंट बोल्ट, मिचेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरेल मिचेल, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साऊदी. राखीव खेळाडू : बेन सीर्स.

logo
marathi.freepressjournal.in