T20 World Cup : न्यूझीलंडवर विजय मिळवत पाकिस्तानची विश्वचषक फायनलमध्ये धडक

उद्या 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाईल आणि विजेता संघ 13 नोव्हेंबरला मेलबर्नच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळेल
T20 World Cup : न्यूझीलंडवर विजय मिळवत पाकिस्तानची विश्वचषक फायनलमध्ये धडक

T20 विश्वचषक 2022 चा पहिला उपांत्य सामना ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला गेला. ज्यामध्ये पाकिस्तानने ७ विकेट्सने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यातील या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना केवळ 152 धावाच करता आल्या. त्यानंतर सलामीवीर बाबर आणि रिझवानच्या मदतीने पाकिस्तानने दमदार सुरुवात केली आणि अखेर 7 विकेट्स राखून विजय मिळवला.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोठी धावसंख्या करून पाकिस्तानवर दबाव टाकण्याचा त्यांचा डाव होता. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दमदार गोलंदाजी केली. विशेषत: शाहीन शाह आफ्रिदीने आपली ताकद दाखवत महत्त्वाच्या विकेट घेतल्या आणि धावा रोखल्या. त्यामुळे न्यूझीलंडने सुरुवातीपासूनच विकेट गमावल्या. फिन ऍलन 4 तर कॉनवेने 21 धावा करून बाद झाले. ग्लेन फिलिप्सही 6 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर केन आणि मिशेलने डाव सावरला. केन 46 धावा करून बाद झाला तर मिशेलने नाबाद 53 धावा केल्या. नीसमॅननेही नाबाद 16 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 2 आणि मोहम्मद नवाजने एक विकेट घेतली.

दुसरी उपांत्य फेरी भारत विरुद्ध इंग्लंड

आता पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. उद्या 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाईल आणि विजेता संघ 13 नोव्हेंबरला मेलबर्नच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in