तन्वी शर्माची सुवर्णपदकाकडे कूच; हुआंग यु-सुनला हरवून अंतिम फेरीत धडक

भारताची युवा बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा हिने तैपेई ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत शानदार कामगिरी करत पहिल्यावहिल्या जागतिक टूर विजेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
तन्वी शर्माची सुवर्णपदकाकडे कूच; हुआंग यु-सुनला हरवून अंतिम फेरीत धडक
तन्वी शर्माची सुवर्णपदकाकडे कूच; हुआंग यु-सुनला हरवून अंतिम फेरीत धडक
Published on

तैपेई सिटी : भारताची युवा बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा हिने तैपेई ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत शानदार कामगिरी करत पहिल्यावहिल्या जागतिक टूर विजेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत तन्वीने चायनीज तैपेईच्या हुआंग यु-सुन हिचा सरळ गेममध्ये पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य फेरीत उन्नती हुड्डाला पराभव पत्करावा लागल्याने भारतीय खेळाडूंमधील अंतिम सामन्याची संधी हुकली.

पंजाबच्या १७ वर्षीय तन्वीने अवघ्या ३३ मिनिटांत जागतिक क्रमवारीत २४ व्या स्थानी असलेल्या यु-सुन हिचा २१-१७, २१-११ असा एकतर्फी पराभव केला. ज्युनिअर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेती असलेल्या तन्वीला आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात व्हिएतनामच्या सहाव्या मानांकित थुई लिन्ह न्युएन हिच्याशी भिडावे लागणार आहे.

पहिल्या गेममध्ये सुरुवातीला ३-३ आणि ७-६ अशी चुरस पाहायला मिळाली. यु-सुनने १५-१७ असा फरक कमी केला होता, परंतु तन्वीने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ९-९ अशी बरोबरी असताना तन्वीने उत्कृष्ट खेळ करत शेवटच्या १४ पैकी १२ गुण मिळवून सामना आपल्या नावे केला.

उन्नती हुड्डा उपांत्य फेरीत पराभूत

दुसऱ्या उपांत्य सामन्यात उन्नती हुड्डाला व्हिएतनामच्या जागतिक क्रमवारीत २१ व्या स्थानी असलेल्या थुई लिन्ह न्युएनकडून १५-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. पहिल्या गेममध्ये मध्यंतरापर्यंत ६-११ ने मागे पडल्यानंतर उन्नतीला सावरता आले नाही. दुसऱ्या गेममध्ये उन्नतीने ५-० अशी दमदार सुरुवात करत मध्यंतराला ११-९ आणि नंतर १६-१२ अशी आघाडी मिळवली होती. मात्र न्युएनने सलग गुण मिळवत १७-१७ अशी बरोबरी साध्य केली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in