WTC final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, रहाणेची संघात वर्णी

जिंक्य रहाणेने जवळपास दीड वर्षानंतर पुनरागमन केले आहे. रहाणेने जानेवारी 2022 मध्ये शेवटची कसोटी खेळली
WTC final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, रहाणेची संघात वर्णी

इंग्लंडमध्ये होणाऱ्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी (ICC World Test Championship) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे आयपीएलमध्ये तुफान फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. अजिंक्य रहाणेने जवळपास दीड वर्षानंतर पुनरागमन केले आहे. रहाणेने जानेवारी 2022 मध्ये शेवटची कसोटी खेळली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठीच्या भारतीय संघाने जाहीर केला. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून ओव्हलवर खेळवला जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 7 ते 11 जून दरम्यान खेळवली जाईल.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

ऑस्ट्रेलिया संघ : कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिशेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in